Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री वर्षा उसगावकर, मृणालीनीची फसवणूक; निर्मात्याने ४७ लाख घेतले, परतावा देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:54 IST

दादर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार जांभळे (४५) यांनी जाधव यांच्या ‘आई मला मारू नको’ चित्रपटात काम केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणालीनी जांभळे यांच्यासह अन्य दोघांची ४७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक, चित्रपट निर्माता अविनाश जाधव यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणुकीवर परताव्याचे प्रलोभन  दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दादर परिसरात राहणाऱ्या तक्रारदार जांभळे (४५) यांनी जाधव यांच्या ‘आई मला मारू नको’ चित्रपटात काम केले होते. ऑगस्ट २०१९मध्ये जाधव यांनी जांभळेंना आपल्या मालकीच्या पनवेल आणि उरण येथील जमिनीत बांधकाम तसेच प्लॉटींग प्रोजेक्ट करत असल्याचे सांगितले. गुंतवणुकीतून मिळणारा सर्व नफा देण्याचे प्रलोभन जाधव यांनी जाधव यांनी जांभळेंना दाखवले. त्याचबरोबर मुद्दल एका वर्षात परत करण्याचीही हमी दिली होती. जांभळे यांनी या ऑफरबद्दल त्यांचा भाऊ मंदार, मैत्रीण वर्षा उसगांवकर आणि झीनत सुलतान सय्यद यांनाही माहिती दिली. 

काय घडले? जांभळे यांनी जाधव यांना २३ लाख रुपये दिले. त्याचे द्विपक्षीय करारपत्रही करण्यात आले. जांभळे यांच्या ओळखीतून मंदार जांभळे,  वर्षा उसगावकर यांनीही प्रत्येकी ११ लाख आणि आणि झीनत यांनी २ लाख अशी २४ लाखांची गुंतवणूक केली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Varsha Usgaonkar, Mrinalini cheated; producer took ₹47 lakhs.

Web Summary : Actress Varsha Usgaonkar and others were allegedly cheated of ₹47 lakhs. Producer Avinash Jadhav is accused of promising returns on investment in land projects, then failing to repay the principal amount after taking money from investors.
टॅग्स :वर्षा उसगांवकरधोकेबाजी