Actress Urmila Matondkar's Batting on MLA Sunil Prabhu's bowling! | आमदार सुनील प्रभू यांच्या गोलंदाजीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी !

आमदार सुनील प्रभू यांच्या गोलंदाजीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची फटकेबाजी !

- मनोहर कुंभेजकर
मुंबई  -दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगला.यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला आणि शुभेच्छा दिल्या.  दिंडोशी विधानसभा क्षेत्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमत्त अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा ‘आमदार चषक 2021’ येथे आयोजन करण्यात आलं. दिंडोशीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. 


यावेळी आपल्या अभिनयन शैलीत भाषण करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी त्यांचा हा दिंडोशीतील हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “या ठिकाणी क्रिकेट खेळताना आणि पाहताना आयपीएल आणि सर्व एकत्र झाल्यासारखं वाटलं. एवढ्या कमी ओव्हरमध्ये इतकी मजा येईल, मजेशीर मॅच होईल असं मला वाटलं नव्हतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वाचं अभिनंदन आणि आयोजकांचे खूप धन्यवाद. आमदार सुनील प्रभू यांनी गोलंदाजी करुन मला फलंदाज करुन टाकले. यावेळी त्यांनी यापुढे भारतीय महिला क्रिकेट टीमने देखील इकडं एक अभिनेत्री, राजकारणीच नाही तर एक क्रिकेटर असल्याचंही लक्षात ठेवावं, असं म्हणत टोला लगावला. यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. 

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात’

उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी मुंबईत येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. हा केवळ एका भागाचा मुद्दा नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न लोकांपर्यंत जरुर पोहचेल. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवो हीच देवाकडे मागणं आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 80 टक्के समाजकरण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकाना दिली. शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांनी दि , १७  ते ३१  पर्यंत "साहेब उत्सवाचे" आयोजन केले आहे.

 यानिमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रात कला, क्रीडा उत्सव, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे अशा सामाजिक जाणिवेचा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत युवासेना आयोजित आमदार चषक क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अभिनेत्री आणि शिवसेनेच्या रणरागिणी उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते आज सायंकाळी पार पडला.

यावेळी मुख्य प्रतोद, आमदार, शिवसेना विभाग प्रमुख सुनिल प्रभु, उपमहापौर अँड.सुहास वाडकर, नगरसेविका व महिला विभाग संघटक साधना माने, नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका विनया सावंत, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे आणि सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन युवासेना मुंबई समन्वयक समृध्द शिर्के आणि रमेश सोलंकी यांनी केले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Urmila Matondkar's Batting on MLA Sunil Prabhu's bowling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.