Join us

'काहे दिया परदेस'मधील 'गौरी' मनसेत पदाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:23 IST

सायली संजीवची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबईः झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव हिची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपण प्रत्येक जण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेतून सायली संजीव विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. मासिक पाळी या महिलांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषयाबाबत गावोगावी जाऊन तिथल्या शालेय मुलींमध्ये आणि अन्य महिलांमध्ये जागृती करण्याचं कामही ती करतेय. तिचं हे काम आणि सामाजिक जाणीव लक्षात घेऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी तिची नेमणूक केली आहे. सेनेचे अध्यक्ष अमित खोपकर यांनी नुकतंच तिला या नियुक्तीचं अधिकृत पत्र दिलं.  

मनसेच्या झेंड्याखाली चित्रपट कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया सायलीनं व्यक्त केली. सायलीसोबतच अभिनेत्री स्मिता तांबे, शर्वणी पिल्लई, उमा सरदेशमुख , जास्मीन वानखेडे यांचीही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या 'उपाध्यक्ष'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :मनसेसायली संजीव