‘मुस्लीम, असल्याने घर मिळत नाही’, अभिनेत्रीने फेसबुकवर व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:46 IST2018-04-05T05:46:48+5:302018-04-05T05:46:48+5:30

गेली आठ वर्ष मुंबईत अभिनय क्षेत्रात कार्यरत असूनही मुस्लीम असल्याने घर मिळत नाही, अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री शिरीन मिर्झा हीने फेसबुकवर शेअर केली आहे.

actress expressed her feelings on Facebook | ‘मुस्लीम, असल्याने घर मिळत नाही’, अभिनेत्रीने फेसबुकवर व्यक्त केली खंत

‘मुस्लीम, असल्याने घर मिळत नाही’, अभिनेत्रीने फेसबुकवर व्यक्त केली खंत

मुंबई - गेली आठ वर्ष मुंबईत अभिनय क्षेत्रात कार्यरत असूनही मुस्लीम असल्याने घर मिळत नाही, अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री शिरीन मिर्झा हीने फेसबुकवर शेअर केली आहे. एका आघाडीच्या हिंदी वाहिनीवरील मालिकेत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने मुस्लीम, अविवाहित आणि अभिनय क्षेत्रात असल्याच्या कारणांमुळे सर्व स्तरांतून घर नाकारत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी आल्यानंतर त्या दरम्यानचा फोटो अपलोड करून ही पोस्ट शिरीनने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिरीनने म्हटले आहे की, माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला दारू, सिगारेटचे व्यसन नाही. तरीही सर्व पातळ्यांवर लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेतात? एखाद्या दलालाला फोन केला तर अविवाहित असल्याचे समजातच भाडे जादा सांगतो. तर काही जण हिंदी व्यक्तीच्या नावावर घर घ्या, असे सुचवितो. या सर्व कारणांचा घर भाडण्यावर मिळण्याशी काय संबंध, असा प्रश्न तिने विचारला आहे.

अनेकांचा मदतीचा हात

‘आमची मुंबई’ असे म्हणताना यातला आपलेपणा हरवलाय, असे तिने म्हटले आहे. या पोस्टवर शिरिनला अनेकांनी प्रतिक्रिया देत मदतीचा हात पुढे केला आहे.

Web Title: actress expressed her feelings on Facebook