Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम शेजारी असल्याने दिवाळी साजरी करु देत नाही; अभिनेत्याने केली पंतप्रधानांना तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 23:25 IST

विश्वा भानूने या संदर्भात ट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

मुंबई - राज्यभरात सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु आहे. मात्र मालाडमध्ये एका अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एक्सेल एंटरनेटमेंटमध्ये काम करणारा अभिनेता विश्वा भानूने ट्विट करून हा प्रकार समोर आला आहे. भानू यांनी ट्विटमध्ये लिहिंलं आहे की, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्याठिकाणी शेजारी मुस्लीम कुटुंब राहतं ते मला दिवाळी साजरी करण्यास मज्जाव करत आहे असा आरोप विश्वा भानूने केला आहे. 

विश्वा भानूने या संदर्भात ट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे. भानूने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी मुस्लीम सोसायटीमध्ये राहतो, माझी पत्नी दिवाळीनिमित्त घराबाहेर दिवे आणि रांगोळी काढत होती मात्र काही जणांनी तिच्यावर आक्षेप घेऊन तिला सण साजरा करण्यापासून रोखला. इतकचं नाही तर त्यांनी जबरदस्तीने दिव्यांची नासधूस केली आणि विद्युत रोषणाईही काढून टाकली. असाच प्रकार मागील वेळीही माझ्यासोबत घडला. 

विश्वा भानूने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास धाव घेतली. याबाबत तक्रारदेखील केली आहे. पण पोलिसांनी मला याबाबत ट्विट करण्यास सांगितल्याचं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुस्लीमनरेंद्र मोदीदिवाळी