Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता विशाल ठक्कर तीन वर्षे बेपत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 01:56 IST

३१ डिसेंबर, २०१५ रोजी ठक्करने त्याची आई दुर्गा यांच्याकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला.

मुंबई : तीन वर्षांपूर्वी गायब झालेला चित्रपट अभिनेता विशाल ठक्कर याचा शोध घेण्यास अद्याप पोलिसांना यश मिळालेले नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. ठक्कर याच्यावर त्याच्या मैत्रिणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्ह्याही दाखल करण्यात आला होता. मात्र नंतर तिने ती तक्रार मागे घेतली.

३१ डिसेंबर, २०१५ रोजी ठक्करने त्याची आई दुर्गा यांच्याकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला. त्यानंतर एका पार्टीसाठी जात असल्याचा मेसेज त्याने घरच्यांना केला. मात्र त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही. त्याच्या घरच्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्याचे करिअर पूर्णपणे संपुष्टात आले होते. त्यामुळे तो नैराश्येत होता, असे त्याची आई दुर्गा यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप १०० हून अधिक लोकांकडे चौकशी केली आहे. मात्र त्याच्याबाबत काहीच माहिती त्यांच्या हाती लागलेली नाही. ठक्करने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘चांदनी बार’ या चित्रपटांसह ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतही भूमिका केली होती. 

टॅग्स :पोलिसमुंबई