Join us

अभिनेता उज्ज्वल धनगर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 05:40 IST

२००८ मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले हाेते. शनिवारी ताे ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी मालिकेचे शूटिंग संपवून घरी आला होता. रविवारी स्थानिक नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत रात्री त्याने जेवण केले.

ठळक मुद्दे२००८ मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले हाेते. शनिवारी ताे ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी मालिकेचे शूटिंग संपवून घरी आला होता. रविवारी स्थानिक नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत रात्री त्याने जेवण केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कटिटवाळा : मराठी रंगभूमीवर, चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा कलाविश्वात ठसा उमटवणारा उज्ज्वल धनगर (वय २९) याचे साेमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात निधन झाले. मूळचा शहापूर तालुक्यातील सापगावचा रहिवासी असलेला उज्ज्वल हा १५ वर्षांपासून टिटवाळा येथे राहत हाेता. ‘स्वराज्य रक्षक संभाजी राजे’ या मालिकेत त्याने साकारलेली खाशाबा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली हाेती. टिटवाळा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.

२००८ मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले हाेते. शनिवारी ताे ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी मालिकेचे शूटिंग संपवून घरी आला होता. रविवारी स्थानिक नगरसेवक संतोष तरे आणि समाजसेवक महेश ऐगडे यांच्यासोबत रात्री त्याने जेवण केले. सोमवारी सकाळी ६ वाजता अचानक त्याच्या छातीत व पोटात दुखायला लागले. त्यामुळे तो टिटवाळा येथील महागणपती रुग्णालयात गेला. तेथे डॉक्टरांशी बाेलून ॲसिडिटी झाल्यासारखे वाटते म्हणून गोळी घेतली व घरी परतला. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने ताे आई-वडिलांसाेबत महागणपती रुग्णालयात दाखल झाला. तेथे उपचारांदरम्यान डाॅक्टरांनी ईसीजी लावल्यानंतर तो मृत झाला असल्याचे सांगितले. त्याच्या निधनाने सर्वत्र शाेककळा पसरली असून, सर्वांना हसवणारा कलावंत हरपल्याची खंत टिटवाळाकरांनी व्यक्त केली. 

टॅग्स :मृत्यूमुंबई