अभिनेता कुणाल गोस्वामीची फसवणूक, ऑनलाइन शॉपिंगमध्ये ९ हजारांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 02:58 IST2019-06-28T02:58:06+5:302019-06-28T02:58:18+5:30

फेसबुकवर आॅनलाइन शॉपिंग करणे चित्रपट निर्माता तसेच अभिनेता कुणाल गोस्वामी यांना महागात पडले आहे़ त्यांच्या क्रेडिट कार्डमधून अवघ्या आठ मिनिटांत ९ हजारांची रक्कम गायब झाली.

Actor Kunal Goswami's cheating, online shopping offers 9 thousand choice | अभिनेता कुणाल गोस्वामीची फसवणूक, ऑनलाइन शॉपिंगमध्ये ९ हजारांचा चुना

अभिनेता कुणाल गोस्वामीची फसवणूक, ऑनलाइन शॉपिंगमध्ये ९ हजारांचा चुना

मुंबई  - फेसबुकवर आॅनलाइन शॉपिंग करणे चित्रपट निर्माता तसेच अभिनेता कुणाल गोस्वामी यांना महागात पडले आहे़ त्यांच्या क्रेडिट कार्डमधून अवघ्या आठ मिनिटांत ९ हजारांची रक्कम गायब झाली. या प्रकरणी त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बँकेकडून काही माहिती मागविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.

गोस्वामी हे फेसबुकवर आॅनलाइन सुटकेस विकत घेणार होते. त्या दरम्यान त्यांनी काही माहिती मिळवण्यासाठी सोशल साइटवर क्लिक केली. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डमधील पैसे दोन वेळा क्रेडिट झाले. हे पैसे चायनिज चलनाच्या स्वरूपात कार्डमधून कमी झाले. त्यामुळे गोस्वामी यांनी लगेचच बँकेच्या हेल्पलाइनला याबाबत कळवत त्यांचे कार्ड ब्लॉक करून घेतले.

तसेच या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेत घडला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी याबाबत बँकेकडे संपर्क करत काही माहिती मागवली आहे. त्याचसोबत पैसे लंपास करणाºया लिंकबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही सायबर सेलची मदत घेत आहोत, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिली.
 

Web Title: Actor Kunal Goswami's cheating, online shopping offers 9 thousand choice