अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा ६ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 05:58 IST2025-05-29T05:58:40+5:302025-05-29T05:58:48+5:30

यापूर्वी सोमवारी डिनो मोरिया व त्याच्या भावाची आठ तास चौकशी करण्यात आली होती

Actor Dino Morea questioned again for 6 hours | अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा ६ तास चौकशी

अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा ६ तास चौकशी

मुंबई : मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणातील तपासासाठी अभिनेता डिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅन्टिनो यांना आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. २८) काही कागदपत्रांसह पाचारण केले होते. त्यानुसार, डिनो बुधवारी येथे हजर झाला होता. त्याची ६  तास चौकशी करण्यात आली असून, त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे.

यापूर्वी सोमवारी डिनो मोरिया व त्याच्या भावाची आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या दाव्यांबाबत पुरावे म्हणून काही कागदपत्रे आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी ते पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले. याप्रकरणी अटक आरोपी केतन कदम व डिनो यांच्यात २०१९ व २०२२ या कालावधीत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. डिनो व सॅन्टिनो दोघेही सहा ते साडेसहा तासांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.  याप्रकरणातील आरोपी कदम न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेला त्यांच्या व्यवहारांबाबतची माहिती मिळाली होती. डिनो कदमला २५ वर्षांपासून ओळखतो. चौकशीसाठी डिनोचा भाऊदेखील उपस्थित होता. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर डिनो व त्याच्या भावाला गरज पडल्यास पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यताही अधिकाऱ्याने वर्तवली आहे.
 

Web Title: Actor Dino Morea questioned again for 6 hours