Join us  

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीसाठी गुन्हा दाखल झालेले कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 6:08 PM

Raj Thackeray : सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे म्हणून आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आज राज ठाकरेंना भेटून नाशिकच्या कार्यकर्त्यांना अहवाल सादर केला आहे. 

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला नाशिकवरून मोठ्या संख्येत मनसेचे कार्यकर्ते शिवतीर्थावर आले होते. ४ मे रोजी मशिदीवरील भोंग्याविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये मनसेचे कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सहभाग नोंदवला होता. मात्र, भोंग्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. नाशिकच्या ३८ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यात ६ महिलांना तडीपारीची नोटीस दिली गेली आहे. सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे म्हणून आमच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आज राज ठाकरेंना भेटून नाशिकच्या कार्यकर्त्यांना अहवाल सादर केला आहे. 

नाशिकच्या मोठ्या नेत्यांवरती कारवाई केल्याने त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे भेटीस आलेल्या कार्यकर्त्यांची पाठ राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी थोपटून कौतुक करण्यात आलं आहे. गुडी पाडव्याच्या झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे तात्काळ हटवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. भोंगे हटवले नाही तर त्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा पवित्रा मनसेने घेतला. तेव्हापासून राज्यातले राजकारण अधिक तापलं आहेत. मुंबईतल्या घाटकोपर येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लाऊड स्पीकरवर लावली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेविरोधात देशातल्या अनेक नेत्यांनी टीका केली.

 

हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे शहरात होणा-या सभेचे आयोजन मे महिन्याच्या २१ ते २८ तारखेच्या दरम्यान पुणे शहर मनसेकडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तसेच सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सुचने नुसार सर परशुरामभाऊ महाविदयालयाचे मैदान निवडत आहोत. तरी सदर कामी आपण योग्य त्या सूचना संबंधीत यंत्रणा व सर परशुरामभाऊ महाविदयालय प्रशासन यांना दिल्यास आम्हाला सभेचे नियोजन करण्यास सहकार्य होईल तरी सदरबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

 

 

टॅग्स :राज ठाकरेमुंबईनाशिकपोलिस