आधारभूतपेक्षा कमी दराने तूरखरेदी केल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:56 IST2018-12-27T05:56:06+5:302018-12-27T05:56:28+5:30
केंद्र सरकारने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिला.

आधारभूतपेक्षा कमी दराने तूरखरेदी केल्यास कारवाई
मुंबई : केंद्र सरकारने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिला.
व्यापारी मनमानी दरात तुरीची खरेदी करीत असून, आधारभूतपेक्षा हजार ते बाराशे रुपयांचा कमी भाव शेतकºयांना देत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. शेतकºयांनी व्यापाºयांना आधारभूतपेक्षा कमी किमतीत तुरीची विक्री करू नये, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे, तसेच तूरविक्री करताना व्यापाºयांना सातबारा उतारा अजिबात देऊ नये, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. शेतकºयांकडून तूरखरेदी करून त्यांच्या सातबाराचा वापर करीत व्यापाºयांनी तीच तूर जादा दराने नाफेडला विकल्याचे प्रकार यापूर्वी घडले होते.
केंद्राकडे प्रस्ताव
गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी तुरीची खरेदी सुरू झाली होती. यंदा ती त्यापेक्षा बरीच आधी सुरू होईल. केंद्र सरकारकडे त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.