संगीत नाटकांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:55 IST2018-01-09T02:55:06+5:302018-01-09T02:55:31+5:30

आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकतार्इंचे सूर ऐकले आहेत. आज त्यांना देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजीकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरू केले आहे.

Action Plan for the Conservation of Music Plays - Vinod Tawde | संगीत नाटकांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा - विनोद तावडे

संगीत नाटकांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा - विनोद तावडे

मुंबई : आकाशवाणीच्या प्रत्येक कार्यक्रमात माणिकतार्इंचे सूर ऐकले आहेत. आज त्यांना देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजीकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरू केले आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे या खºया अर्थाने महाराष्ट्राच्या ‘माणिक’ आहेत, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी काढले.
सांस्कृतिक संचालनालयातर्फे दरवर्षी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे दिला जाणारा यंदाचा पुरस्कार पं. अरविंद पारिख यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना देण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पं. केशव गिंडे, पं. नाथ नेरुळकर आदी उपस्थित होते. नवीन पिढीत राष्ट्रीय संगीताची आवड आणि गोडी रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. २०१९मध्ये बाबुजी सुधीर फडके, गदिमा व पु.ल. देशपांडे याचे जन्मशताब्दी वर्ष येत आहे. यावर्षामध्ये फक्त उत्सव साजरे करायचे नसून, नवीन पिढीत २५ संगीतकार कवी, गायक, साहित्यिक निर्माण करावयाचे उद्दिष्ट असल्याचे तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामासाठी दुप्पट अर्ज
महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामाची स्थापना गेल्या वर्षी करण्यात आली. या स्कूल आॅफ ड्रामामध्ये २५ जागा असल्या तरीही येथे प्रवेश मिळविण्यासाठी दुप्पट अर्ज आले. आता या स्कूल आॅफ ड्रामाचा अभ्यासक्रम पूर्ण होत असून लवकरच महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामामधून २५ विद्यार्थी यशस्वीपणे बाहेर पडतील, अशी माहिती तावडे यांनी दिली.

पुरस्कार हा गुरू-शिष्य परंपरेचा गौरव - माणिक भिडे
आज आपल्याला मिळालेला पुरस्कार वैयक्तिक नाही, तर गुरूंचा आशीर्वाद आहे. संगीत क्षेत्रात गुरू-शिष्याची परंपरा आजही कायम असून माझा गौरव म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचा गौरव आहे. नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळत असून शास्त्रीय संगीतामध्ये संगीतसाधक व्हायचे असेल तर गुरू-शिष्य परंपरा जोपासली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आज सोशल मीडियाच्या जमान्यात संगीताचा गाभा सर्वांना जपायचा आहे. त्याचे भान सर्वांनी राखायचे आहे.

Web Title: Action Plan for the Conservation of Music Plays - Vinod Tawde