मुंबई - भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने श्रीलंकेतील शिपयार्ड कोलोंबो डॉकयार्ड पीएलसीमधील ५१ टक्के नियंत्रक हिस्सा खरेदी पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. सुमारे २६.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक असलेला हा व्यवहार माझगाव डॉकचा पहिला आंतरराष्ट्रीय अधिग्रहण व्यवहार ठरला असून, ‘मेरीटाइम अमृत काल व्हिजन २०४७’अंतर्गत हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
कोलोंबो डॉकयार्ड पीएलसी संचालक मंडळाची पुनर्रचनाही करण्यात आली आहे. निवृत्त कॅप्टन जगमोहन यांची नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बिजू जॉर्ज आणि रुचिर अग्रवाल यांचीही संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. थीमीरा गौडकुंबरा हे एम. डी. म्हणून कार्यरत राहणार आहेत, तर विश गोविंदसॅमी यांची एम.डी.एल.चे नामनिर्देशित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच एम. डी. एल. सध्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत जहाजदुरुस्ती आणि नूतनीकरण कामे कोलोंबो डॉकयार्डकडे वळवण्याबाबत चर्चा करत आहे. यामुळे भारत-श्रीलंका सागरी सेवा सहकार्य अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. तर एम.डी.एल.ने चालू आर्थिक वर्षात कोलोंबो डॉकयार्डच्या महसूल आणि नफ्यात २० टक्के वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्यासाठीही हा ऐतिहासिक क्षण आहे. करार आणि चर्चा ही या भागीदारीची ठोस सुरुवात आहे. आम्हाला चालू वर्षात २० टक्के वाढ साध्य करण्याचा विश्वास आहे, असे कॅप्टन जगमोहन यांनी सांगितले. दरम्यान, या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांतील द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ होणार आहेत.
Web Summary : Mazagon Dock acquired a 51% stake in Colombo Dockyard, strengthening India-Sri Lanka maritime cooperation. This marks Mazagon Dock's first international acquisition, aiming for 20% revenue growth for Colombo Dockyard this fiscal year. It signifies a boost to bilateral relations.
Web Summary : मझगांव डॉक ने कोलंबो डॉकयार्ड में 51% हिस्सेदारी का अधिग्रहण किया, जिससे भारत-श्रीलंका समुद्री सहयोग मजबूत हुआ। यह मझगांव डॉक का पहला अंतर्राष्ट्रीय अधिग्रहण है, जिसका लक्ष्य इस वित्तीय वर्ष में कोलंबो डॉकयार्ड के राजस्व में 20% की वृद्धि करना है। यह द्विपक्षीय संबंधों को बढ़ावा देता है।