गुंगीचा पदार्थ देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप, फरारी आरोपीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:49 IST2017-10-13T02:49:13+5:302017-10-13T02:49:30+5:30

गुंगीचा पदार्थ मिसळलेले शितपेय पाजून बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला मेकअप आर्टीस्ट अतुल कदम याचा दिंडोशी पोलीस शोध घेत आहेत.

 The accused of raping a married couple by giving substance in the gooseberries, the search for the absconding accused | गुंगीचा पदार्थ देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप, फरारी आरोपीचा शोध सुरू

गुंगीचा पदार्थ देऊन विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप, फरारी आरोपीचा शोध सुरू

मुंबई : गुंगीचा पदार्थ मिसळलेले शितपेय पाजून बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला मेकअप आर्टीस्ट अतुल कदम याचा दिंडोशी पोलीस शोध घेत आहेत.
अश्लिल चित्रिकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून अतुल कदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने आपली अश्लिल छायाचित्रे सासू - सासरे तसेच मित्रमैत्रिणींना पाठवल्याची पिडीत महिलेची तक्रार आहे. आरोपी अतुल कदम आठ दिवसांपूर्वी शूटींगवरून मुंबईत परतला. मात्र आपल्या गाडीसह तो भूमिगत झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकशन शोधण्यासाठी सीडीआर मागवून ताब्यात घेतले आहे. सीडीआरद्वारे मोबाईलचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता येते.
तीन मुले असलेली पीडित महिला शैला (बदललेले नाव) ही गेल्या नऊ वर्षांपासून गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करते. कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी २0१४ रोजी आरोपीने आपल्याला त्याच्या गोरेगाव (पुर्व) येथील नागरी निवारा परिषदेतील घरी बोलावले आणि शितपेयात गुंगीचा पदार्थ मिसळून बेशुद्धावस्थेत असताना आपल्यावर बलात्कार केला, असे महिलेने जबाबात नमूद केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी याप्रकरणी जलदगतीने तपास करावा, असे निवेदन राष्ट्रीय अपराध आणि भ्रष्टाचार निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना सादर केले आहे.

Web Title:  The accused of raping a married couple by giving substance in the gooseberries, the search for the absconding accused