परिवहनच्या २३० बसेसना मान्यता

By Admin | Updated: May 21, 2014 04:37 IST2014-05-21T04:37:22+5:302014-05-21T04:37:22+5:30

ठाणे परिवहन सेवेला केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएमच्या निधीतून मिळणार्‍या २३० बस खरेदी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Accreditation of 230 buses | परिवहनच्या २३० बसेसना मान्यता

परिवहनच्या २३० बसेसना मान्यता

घोडबंदर : ठाणे परिवहन सेवेला केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएमच्या निधीतून मिळणार्‍या २३० बस खरेदी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात या बसेस रस्त्यावर आल्यानंतरच प्रवाशांना दिलासा मिळणार असला तरी या नव्या बसेसमुळे परिवहनच्या बसची संख्या वाढणार आहे. परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना खासगी बसचा सहारा घ्यावा लागत आहे. बस खरेदी करण्याची क्षमता ठाणे महापािलकेची नसल्यामुळे केंद्र शासनाकडून मदत घेण्यात येत आहे. जेएनएनयूआरएमच्या निधीतून यापूर्वीही २०० बसेस घेण्यात आल्या होत्या. सध्या २३० बसेस घेण्याचा परिवहनचा इरादा आहे. त्या संदर्भातला प्रस्ताव रेंगाळला होता. परिवहन समिती अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रस्ताव व महासभेपुढे मंजुरीसाठी ७ मार्च रोजी आणण्यात आला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव तहकूब ठेवला होता. त्यामध्ये ५० मिडी, १४० स्टॅँडर्ड, ३० व्हॉल्वो व १० डिझेल बसेस खरेदी करण्याचा विषय होता. मंगळवारच्या महासभेत हा विषय पुन्हा पटलावर घेतल्यानंतर त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Accreditation of 230 buses