Join us

ताडदेव आगप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 10:07 IST

अग्निशमन दलाचा अहवाल सोमवारी येणे अपेक्षित आहे.

मुंबई : ताडदेव परिसरातील कमला या इमारतीत शनिवारी लागलेल्या आगप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांना अग्निशमन दल तसेच मुंबई महापालिकेच्या अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अग्निशमन दलाचा अहवाल सोमवारी येणे अपेक्षित आहे. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. तसेच १५ व्या मजल्यावरून आग वाढत १९ व्या मजल्यावर गेल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारच्या आगीच्या या दुर्घटनेत इमारतीतील ६ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तर एकूण २४ जण जखमी झाले आहेत. 

टॅग्स :आग