Join us  

बविआच्या माजी नगरसेवकाचा अपघाती मृत्यू, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पहाटेची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:05 PM

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वासमारे ब्रीजजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेंपोला त्यांची भरधाव कार समोरासमोर धडक देऊन भीषण अपघात झाला आहे.

मंगेश कराळे -नालासोपारा :- आचोळे रोडवरील डॉन लेन परिसरात राहणारे बविआचे माजी नगरसेवक श्याम पेंढारी यांचा बुधवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास अपघातीमृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वासमारे ब्रीजजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेंपोला त्यांची भरधाव कार समोरासमोर धडक देऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी मिरा रोडच्या भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. श्याम पेंढारी यांची पत्नी जया पेंढारीही माजी नगरसेविका आहेत. त्यांना मिथुन आणि अमित नावाची दोन मुले आहेत.

मंगळवारी रात्री श्याम पेंढारी हे मिरा रोडला एका चालकासह ब्रिझा कारने गेले होते. बुधवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास ते स्वतः कार चालवून नालासोपाऱ्यातील घरी महामार्गावरून येत होते. महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असून मुंबईकडे जाणारी एक लेन गुजरात लेन वरून सुरू केली होती. याच लेनवर मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेंपोला त्यांची कार धकडल्याने भीषण अपघात झाला आहे. नायगांव पोलिसांची टीम घटनास्थळी पोहचून पंचनामा करून पुढील तपास करत आहे.

टॅग्स :अपघातमृत्यू