Join us

वरळीत भीषण अपघात; वेगवान कारने दुभाजकाला धडक दिल्याने 3 ठार तर 1 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 12:49 IST

कार चालविणाऱ्या महिलेला रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये दाखल केले गेले आहे

मुंबई: वरळी परिसरात वेगवान कारने दुभाजकाला धडक दिल्याने भीषण अपघात झालेला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 3 जण ठार झालेत तर 1 जण जखमी आहे.   

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कार चालविणाऱ्या महिलेला रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये दाखल केले गेले आहे, अपघातात ती गंभीर आहे. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. 

मृतांमध्ये सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. तसेच दोन वरिष्ठ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. नमिता भातिजा या बीएमडब्ल्यूची कार चालवत होत्या. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. यामध्ये बीएमडब्ल्यूच्या पुढील भागाचा चुराडा झाला आहे.

टॅग्स :अपघातमुंबई