Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडहून जेजुरीला निघालेल्या भाविकांचा अपघात, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:28 IST

सदर मिनीबस ही मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा येथून जेजुरीकडे निघाली होती. अपघातामध्ये बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील HOC ब्रिजच्या उतारावरील धोकादायक वळणावर आज दि. १३/०५/२०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या दरम्यान फोर्स मिनी बस क्रमांक MH.06.BW.4030 हिचा भीषण अपघात झाला. भरत रमेश शेळके   या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस रस्त्यावर पलटी झाली.

सदर मिनीबस ही मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा येथून जेजुरीकडे निघाली होती. अपघातामध्ये बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये कमलाबाई रामचंद्र माळी, गुरुनाथ डोंगरे, बाळाराम भोईर, रवींद्र राम माळी, गुलाबबाई दत्तू हुमणे, अशोक जयराम डोंगरे, कस्तुरी गणेश माळी आणि मीनाबाई गुरुनाथ डोंगरे यांचा समावेश आहे. सर्व जखमी हे मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट विभाग, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स, स्वामिनी ॲम्बुलन्स तसेच हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविले.

बस अपघातातील जखमींवर प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोपोली नगरपालिका रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना MGM हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims Injured in Accident En Route to Jejuri from Murbad

Web Summary : A mini-bus carrying pilgrims from Murbad to Jejuri met with an accident near Khopoli, injuring several passengers. The injured were shifted to hospitals in Khopoli and Panvel for treatment. Police are investigating the incident.
टॅग्स :अपघात