गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 09:18 IST2025-09-07T09:05:29+5:302025-09-07T09:18:11+5:30
मुंबईतील साकीनाका परिसरात गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाली.

गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. साकीनाका परिसरात एका ट्रॉलीला उच्चदाबाच्या वायरचा शॉक बसून एका मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
मिळालेल्या माहितीनुसार, खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी ट्रॉलीला उच्च दाबाच्या वायचा शॉक बसला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मंडळाची ट्रॉली सजवली होती. या मंडळाची मिरवणूक ज्या मार्गानी निघाली होती त्या रस्त्यावर टाटा पॉवर कंपनीची ११ हजार व्होल्टेजची उच्च दाबाची वायर जाते. त्या वायरमधून एक लहान वायर खाली लटकत होती. ती वायर ट्रॉलीला लागल्याने विजेचा शॉक लागला. जे लोक ट्रॉलीमध्ये होते त्यांना झ
का बसला.
या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बिनू शिवकुमार असे आहे. तर या घटनेतील जखमींची नावे अशी, धर्मराज गुप्ता, आरुष गुप्ता, शंभू कामी, करण कनोजिया अशी आहेत.