लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:52 IST2025-06-11T07:52:08+5:302025-06-11T07:52:29+5:30

Mumbai Suburban Railway: लोकलच्या तिकीटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. मुंब्राजवळील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आपली पाऊण तास चर्चा झाली.

AC local travel facility at local rates, Chief Minister Devendra Fadnavis hinted | लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

मुंबई - लोकलच्या तिकीटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. मुंब्राजवळील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आपली पाऊण तास चर्चा झाली. एसी लोकलचे दर समान पातळीवर आणण्यासंदर्भात त्यांचीही योजना आहे, असे फडणवीस म्हणाले.

लोकलमधून प्रवास करणारे आमच्या दृष्टीने दुय्यम अजिबात नाहीत, त्यांनाही लोकलच्या भाडेदरात एसी लोकल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक लोकलला ॲटोमॅटिक दरवाजे बसविण्यासंदर्भात काही आक्षेप घेतले जात आहेत, मात्र असे दरवाजे बसवताना व्हेंटिलेशनची व्यवस्था आधी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत ते म्हणाले, सरकारी कार्यालयांबाबत अशी सुविधा आधीपासून दिलेली आहे, खासगी आस्थापनांशी चर्चा करता येऊ शकेल.

Web Title: AC local travel facility at local rates, Chief Minister Devendra Fadnavis hinted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.