उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

By सचिन लुंगसे | Published: May 7, 2024 05:37 PM2024-05-07T17:37:26+5:302024-05-07T17:38:02+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे

AC local on-demand in summer; Between May 1 and 6, 9 lakh 16 thousand 93 passengers traveled | उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई : घाम काढणा-या मे महिन्यात ठंडा ठंडा कूल कूल राहण्यासाठी मुंबईकरांकडून एसी गाड्यांना अधिकाधिक पसंती दर्शविली जात असून, त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर धावणा-या एसी लोकलच्या प्रवाशी संख्या वाढत आहे. या वाढत्या प्रवाशांनी गेल्या दिवसांत ६ दिवसांत १ लाख ६० हजार ६४५ तिकिट काढले असून, गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा ३० टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे. १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला आहे.

मे / तिकिट / पास / एकूण तिकिट / प्रवासी
१ / २३१०३ / १७२४ / २४८२७ / १२९४८०
२ / २७५५९ / ३४५७ / ३१०१६ / २२९९३७
३ / २९२९० / १५२० / ३०८१० / १२२६७९
४ / २१८६५ / ८३३ / २२६९८ / ७५१५४
५ / १७७३४ / १५४४ / १९२७८ / १११६२०
६ / २८२७९ / ३७३७ / ३२०१६ / २४७२२३
एकूण / १४७८३० / १२८१५ / १६०६४५ / ९१६०९३

६ मे रोजी ३२ हजार १६ एवढी तिकिट विक्री झाली असून, २ लाख ४७ हजार २२३ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

१ ते ६ मे दरम्यान १ लाख ६० हजार ६४५ एवढी तिकिट विक्री झाली असून, ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

एप्रिल ते मे दरम्यायान ९ लाख ५२ हजार ५१३ एवढी तिकिट विक्री झाली असून, ४६ लाख ३७ हजार ४०१ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Web Title: AC local on-demand in summer; Between May 1 and 6, 9 lakh 16 thousand 93 passengers traveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.