भरस्त्यात महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:24 IST2020-12-16T04:24:16+5:302020-12-16T04:24:16+5:30

- कुरारमधील धक्कादायक प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकतर्फी प्रेमातून अंधाराचा फायदा घेत तीस वर्षीय महिलेचा भररस्त्यात ...

Abuse of a woman | भरस्त्यात महिलेचा विनयभंग

भरस्त्यात महिलेचा विनयभंग

- कुरारमधील धक्कादायक प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकतर्फी प्रेमातून अंधाराचा फायदा घेत तीस वर्षीय महिलेचा भररस्त्यात विनयभंग करण्याचा प्रकार मालाडच्या कुरार परिसरात रविवारी घडला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल राणे (३५) नामक व्यक्तीला अटक केली.

राणे हा मालाड पूर्वच्या वाघेश्वरी मंदिर परिसरात राहतो. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या राणेचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या महिलेवर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे अनेकदा तो तिला पाहून अश्लील इशारे करायचा असा महिलेचा आरोप आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला दुकानातून काही सामान घेऊन तिच्या घरी परतत होती. त्यावेळी राणे त्या ठिकाणी उभा होता. रात्रीची वेळ आणि आसपास कोणी नसल्याचे पाहत त्याने महिलेला पकडले आणि तिच्या गालासोबत अश्लील चाळे करू लागला. ही बाब जवळून जाणाऱ्या एका तरुणाने पाहत राणेला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राणे त्यालाही धमकावू लागला. त्यांच्यात सुरू असलेल्या बाचाबाचीच्या आवाजाने स्थानिकही घटनास्थळी जमू लागले आणि नंतर त्याला पकडून कुरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. राणे हा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागे असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

Web Title: Abuse of a woman