जे. जे. रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 06:31 IST2023-04-12T06:31:40+5:302023-04-12T06:31:53+5:30

आईसोबत सोनोग्राफीसाठी आलेल्या ९ वर्षांच्या मुलीला जे. जे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना

Abuse of minor girl in J J hospital A case has been registered against an unknown person | जे. जे. रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

जे. जे. रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई :

आईसोबत सोनोग्राफीसाठी आलेल्या ९ वर्षांच्या मुलीला जे. जे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. रुग्णांची लगबग असणाऱ्या या रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

भायखळा येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय तक्रारदार ९ वर्षाच्या मुलीसोबत सोमवारी मुख्य इमारतीतील सोनोग्रॉफी विभागात आल्या. मुलीला सोनोग्रॉफी विभागाबाहेर बसवून तक्रारदार नंबर लावण्यासाठी गेल्या. नंबर लावून  बाहेर  येताच, मुलगी जागेवर न दिसल्याने त्यांना धक्का बसला. सकाळी १०:४० ते १०:५० च्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने मुलीला एकटे पाहून तिला मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील पुरुष शौचालयात नेले. तेथे मुलीसोबत अश्लील चाळे सुरू असताना मुलीने पळ काढला. आईची भेट होताच तिने हंबरडा फोडला. 

प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला... 
मुलीला शौचालयात नेण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणाने तिला तिसऱ्या मजल्यावरील एका आडोशाला असलेल्या पुरुष शौचालयात नेले. आरोपी लैंगिक अत्याचार करणार, तोच मुलीने प्रसंगावधान दाखवत तेथून पळ काढला. दरवाजा नसल्याने तेथील कापडी पडदा बाजूला करत ती पळाली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशीही भीती पोलिसांनी वर्तविली. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात 
पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. महिला उभी असलेल्या ठिकाणी आरोपी वावरताना फुटेजमध्ये दिसत आहे. याबाबत तपास सुरू असून, लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, अशी  माहिती जे. जे. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिली आहे.

Web Title: Abuse of minor girl in J J hospital A case has been registered against an unknown person