Join us

व्यायाम प्रशिक्षकाच्या घरात लाखोंची लूट

By गौरी टेंबकर | Updated: March 21, 2023 19:19 IST

बोरिवली पश्चिमच्या योगी नगर मध्ये राहणाऱ्या तुषार नावगे या व्यायाम प्रशिक्षकाच्या घरात जवळपास साडेपाच लाख रुपयांची लूट करण्यात आली. 

मुंबई: बोरिवली पश्चिमच्या योगी नगर मध्ये राहणाऱ्या तुषार नावगे (३१) या व्यायाम प्रशिक्षकाच्या घरात जवळपास साडेपाच लाख रुपयांची लूट करण्यात आली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १८ मार्च रोजी ते सहकुटुंब विक्रोळीला मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्या आईने सर्व दागिने हॉलमध्ये असलेल्या टेबलवरच काढून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्या सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेल्या. 

मात्र त्या घरी परतल्या तेव्हा टेबलवर दागिने नव्हते. सुरुवातीला त्यांच्या पतीने दागिने कपाटात ठेवल्याचे त्यांना वाटले मात्र त्यांना विचारल्यावर त्यांनी नकार दिला. म्हणून अख्ख्या घरात दागिन्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते कुठेच सापडले नाही. तेव्हा नावगे यांनी बिलासह एम एस बी कॉलनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोराचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीचोरीबोरिवली