Join us

अभिषेक-करिष्मा लग्नात एकत्र आले आणि पुढे हे घडलं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 14:27 IST

बच्चन आणि कपूर ही बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख आणि दबदबा असलेली कुटुंब. या दोन्ही परिवारांमध्ये करिष्मा आणि अभिषेकच्या लग्नाची बोलणी झाली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता.

मुंबई - बॉलिवूडमध्ये प्रेम आणि ब्रेकअप नेहमीच चालू असते. काही महिने, काही वर्ष टिकणाऱ्या या रिलेशनशिप अल्पकाळासाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. पण काही कपल्सचे लव्ह, ब्रेकअप प्रेक्षक कधीच विसरत नाहीत. अशा कपल्सपैकी एक आहे करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन. बच्चन आणि कपूर ही बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख आणि दबदबा असलेली कुटुंब. या दोन्ही परिवारांमध्ये करिष्मा आणि अभिषेकच्या लग्नाची बोलणी झाली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण अचानक एकदिवस लग्न मोडल्याची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. 

हे लग्न का मोडले ? काय कारण ठरले त्याचा खुलासा ना कधी बच्चन कुटुंबाने केला ना कपूर कुटुंबाने. फक्त माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु राहिल्या. करिष्माची आई बबिता दोघांच्या रिलेशनशिपमध्ये नको तेवढा हस्तक्षेप करत असल्यामुळे हे लग्न मोडले असे त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. नेमके हे लग्न का मोडले ? त्याची ठोस माहिती आजही कोणाकडे नाही. अभिषेक आणि करिष्माच्या या ब्रेकअपला आज एक दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. 

अलीकडेच अबु धाबीच्या वाल्डोरफ अॅस्टोरिया येथे मोहित मारवाहच्या लग्न सोहळयाच्या निमित्ताने अभिषेक आणि करिष्मा एका छताखाली एकत्र आले होते. समोरासमोर आल्यानंतर दोघांची अवघडल्यासारखी स्थिती झाली असेल असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे काही घडलेले नाही. दोघांचा या कार्यक्रमातील वावर इतका सहज होता कि, बच्चन आणि कपूर कुटुंबामध्ये कुठले भांडण आहे असे पाहणाऱ्याला वाटले नाही. 

दोन्ही कुटुंबामध्ये आता ती कटुता राहिलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये अभिषेकची बहिण श्वेता बच्चन आणि करिष्मा कपूर एकत्र दिसत आहेत. याआधी मनिष मल्होत्राच्या 50 व्या बर्थ डे पार्टीमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्यासह आला होता. त्यावेळी करिष्मा एकटी या पार्टीला आली होती. 

टॅग्स :करिश्मा कपूरअभिषेक बच्चन