Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिजीत बिचुकले शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:22 IST

अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात

मुंबई - आपल्या अतिशयोक्ती बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले बिग बॉस फेम कलाकार अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, आपल्या मित्राच्या पक्षप्रवेशावेळी ते व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदेंना भेटले, त्यावेळी कानात काहीतरी बोलल्याचंही दिसून आलं. त्यामुळे, बिचुकलेंनी शिंदे गटात प्रवेश केला का, अशी चर्चा फोटो आणि व्हिडिओ पाहून रंगली होती. मात्र, या चर्चेला बिचुकले यांनी पूर्ण विराम दिला असून मी मुख्यमंत्री शिंदेंची सदिच्छा भेट घेतलू असून माझ्या काही अडचणी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नगरसेवकपासून राष्ट्रपतीपदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र, त्यांनी या भेटीवर स्पष्टीकरणही दिलंय. “माझ्या काही राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. साताऱ्यात नवीन नगरपालिका होणार आहे, त्याबाबतही चर्चा केली. गेली वीस वर्षे छत्रपती उदयनराजे भोसलेंना विरोध करुन मोठा झालो असून, माझा तो बाणा आहे. मला आईवडिलांनी काही संस्कार शिकवले आहेत. त्यामुळे, मी निडर होऊन काम करतो आणि निर्व्यसनी आहे, असेही बिचुकले यांनी म्हटले. 

पंतप्रधान होण्याचं माझं स्वप्न

“एका पक्षाला किंवा अभिजित बिचुकलेला राज्य, देश चालवणे शक्य नाही. त्यामुळे, देशात अनेक पक्ष आणि राजकीय नेते आहेत. मला देशाचा पंतप्रधान बनायचं, हे माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रातील अद्याप कोणीही पंतप्रधान झालं नाही. लोकमान्य टिळक म्हणायचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणार’. तसेच, ‘मी महाराष्ट्रातला आहे, मला पंतप्रधान व्हायचं आहे.’ जे माझ्या भूमिकेशी सहमत आहेत, ते मला पाठिंबा देऊ शकतात, असे बिचुकले यांनी म्हटले.  

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईअभिजीत बिचुकलेराजकारण