आरेत बिबट्याचा मुक्त वावर,सुदैवाने बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 09:47 PM2019-08-30T21:47:27+5:302019-08-30T21:52:43+5:30

आरे पुन्हा एकदा चर्चेत आले.

In Aarey leopard are free, fortunately school worker survived from leopard the attack | आरेत बिबट्याचा मुक्त वावर,सुदैवाने बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी बचावली

आरेत बिबट्याचा मुक्त वावर,सुदैवाने बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी बचावली

Next
ठळक मुद्देदुपारच्या शाळेची वेळ सकाळी 11.30 ते संध्याकाळी 5.30 अशी करावी अशी मागणी आता येथील शिक्षक व पालकांकडून जोर धरू लागली आहे.त्यामूळे प्रत्येकजण घाबरले होते आणि शाळा सोडण्यास तयार नव्हते.

मनोहर कुंभेजकर
मुंबई - आज एकीकडे मेट्रोच्या कार शेडसाठी आरेतील 2328 वृक्ष तोड होत असतांना, आरे पुन्हा एकदा चर्चेत आले.आज ही आरेत बिबट्याचा मुक्त संचार आहे.काळोख पडल्यावर बिबट्या शिकारीसाठी  बाहेर पडतो. आरेत बिबट्याचा मुक्त वावर असून सुदैवाने आज सायंकाळी हल्ला करण्याचा तयारीत असलेल्या बिबट्याचा हल्ल्यातून शाळेची महिला कर्मचारी थोडक्यात बचावली आहे.

आता आज सायंकाळी शिकारी साठी आरे 16 नंबर येथे  मराठी शाळा क्रमांक 2 येथे बिबट्या आला होता. येथील कर्मचारी रेश्मा काटे या आज सायंकाळी 6 वाजता शाळेतून घरी जायला निघाल्या.गेटच्या बाहेर त्या घरी पवईला जाण्यासाठी सेक्टर 16 ला बेस्ट बस पकडायला मोबाईल वर मुलीशी बोलत चालत बस स्टॉप जात होत्या.शाळेच्या गेट बाहेर तर रस्त्यावर बिबट्याला बघून तर येथील कर्मचारी रेश्मा काटे तर खूप भयभीत झाल्या.त्यांची व बिबट्याची नजरानजर झाली.बिबट्या..बिबट्या त्या जोऱ्यात ओरडल्या.आणि मग बिबट्या तेथून निघून गेला.एक सेकंद जरी उशीर झाला असता ,तर बिबट्याने माझ्यावर हल्लाच चढवला असता असे त्यांनी लोकमतला सांगितले.माझे  दैव बलवत्तर असल्याने बिबट्याने  त्यांच्यावर हल्ला केला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

याबाबत येथील शिक्षक विनायक वळवईकर यांनी सांगितले की,आज संध्याकाळी आरे कॉलनी मराठी शाळा क्रमांक 2 मधील शाळा सुटल्यानंतर रस्त्यावरुन जात असतांना येथील कर्मचारी  रेश्मा काटे यांना बिबट्या दिसला. जेव्हा एक बिबट्या त्यांच्या जवळून गेला त्यावेळी त्या खूप भेदरलेल्या अवस्थेत होता त्यांना बिबट्याचा भयावह अनुभव आला.बिबट्याला बघून रेश्मा काटे किंचाळल्या आणि परत शाळेत जाऊन त्यांनी बिबट्याचा थरार इतर सर्व शिक्षकांना सांगितला. त्यामूळे प्रत्येकजण घाबरले होते आणि शाळा सोडण्यास तयार नव्हते.

येथील दुपारच्या सत्रातील शिक्षक सुरक्षित नाहीत. आज ढगाळ वातावरण आणि अंधार होता,त्यामुळे बिबट्या शिकारीच्या शोधात येथे  फिरत होता.काही वर्षा पूर्वी इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी गेटच्या प्रवेशद्वारावर प्रकाश साळुंखे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला. या शाळेत शिक्षकांचे काम करणे खूप धोकादायक आहे. त्यांनी दुपारच्या शाळेची वेळ सकाळी 11.30 ते संध्याकाळी 5.30 अशी करावी अशी मागणी आता येथील शिक्षक व पालकांकडून जोर धरू लागली आहे.

Web Title: In Aarey leopard are free, fortunately school worker survived from leopard the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.