आज रंगणार आमिर खान अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत..! सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 05:47 IST2026-03-10T05:46:50+5:302026-03-10T05:47:49+5:30

मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने होणार दिमाखदार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा, कार्यक्रमाला असणार दिग्गजांची मांदियाळी

Aamir Khan and Chief Minister Fadnavis will be seen in a grand ceremony today..! The 'teaser' of Lokmat's awards ceremony aired on C-Link | आज रंगणार आमिर खान अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत..! सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर'

आज रंगणार आमिर खान अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत..! सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर'

मुंबई : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा मंगळवार, दि. १० मार्च रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे रंगणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत प्रख्यात अभिनेता आमिर खान घेणार आहेत. हे यावर्षीच्या सोहळ्याचे आगळेवेगळे आकर्षण असणार आहे. या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असेल. याच समारंभात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या इतिहासात दुसऱ्यांदा हा समारंभ, भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या समारंभाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण, वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील यांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान या दोघांची एकाच व्यासपीठावर एकत्रित मुलाखत पहिल्यांदा होत आहे.

सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर'

समुद्रावर बांधलेला, केबल-स्टेड तंत्रज्ञान वापरलेला, शहरातील द्रुतगती वाहतुकीसाठी तयार केलेला वांद्रे वरळी सागरी सेतू हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे. या पुलावर विद्युत रोषणाईच्या साहाय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमिर खान यांचे फोटो कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला झळकले.

सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने निवड केलेल्या महाराष्ट्रातील गुणवंतांच्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप

लोकसेवा समाजसेवा, शिक्षक, वैद्यकीय मुंबई, वैद्यकीय शासकीय, वैद्यकीय महाराष्ट्र, कृषी, क्रीडा, उद्योग, स्टार्टअप, आयएएस प्रॉमिसिंग, आयपीएस प्रॉमिसिंग, राजकारण इन्फ्लुएन्शियल आणि राजकारण प्रॉमिसिंग या विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने निवड केलेल्या विजेत्यांचा यावेळी सन्मान होईल.

Web Title : लोकमत कार्यक्रम में आमिर खान और मुख्यमंत्री फडणवीस मिलेंगे।

Web Summary : लोकमत के 'महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' कार्यक्रम में आमिर खान मुख्यमंत्री फडणवीस का साक्षात्कार लेंगे। अशोक सराफ को लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार मिलेगा। कार्यक्रम विभिन्न क्षेत्रों के प्राप्तकर्ताओं को सम्मानित करेगा।

Web Title : Aamir Khan and CM Fadnavis to meet at Lokmat event.

Web Summary : Aamir Khan will interview CM Fadnavis at Lokmat's 'Maharashtrian of the Year' event at Gateway of India. Ashok Saraf will receive a lifetime achievement award. The event will honor achievers across various fields.