Join us

मुंबईत रस्त्यासाठी लागणाऱ्या खडीची कामे एकाच कंपनीला का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 14:15 IST

आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.  

मुंबई- 'संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पर्यावरणाची हानी झाली आहे. नागपुरात वारे गावचा विषय आहे, तर मुंबईत आरेचा विषय आहेत. हे विषय हाताळत असताना आता घोटाळे सरकार दुसऱ्या बाजूला विकासाच्या नावावर मोठी अनियमितता करत आहे.  हे सरकार मोठे घोटाळे करत आहे. कोणत्याही महानगरपालिकेत नगरसेवक, लोकप्रतिनिधी नसताना हे लोक मोठी कामे करत आहेत, असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.  

१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील रस्त्याच्या स्केलचा विषय होता. त्यासोबत बरोबर पाच कंपन्यांना ही काम मिळाली. आपली सिस्टीम ही लोकप्रतिनिधींची असते. ती सिस्टीम नसताना ही मोठी कामं पाच कॉन्ट्रक्टरांना दिली जातात. त्यांना घाईघाईत वर्क ऑर्डर दिल्या जातात. पण, अजुनही काम सुरू झाल्याचे दिसत नाही. आता ही काम कुठे सुरू झालेत याच उत्तरं मिळालं पाहिजे. ६ हजार ८० कोटींचे टेंडर आहेत. यातील १० टक्के अॅडव्हान्स ६५० कोटी आहेत  हे मुंबईकरांचे पैसे आहेत. याची अजुनही उत्तर मिळालेली नाहीत. आतापर्यंत ही काम मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतीत, पण ती अजुनही झालेली दिसत नाहीत. मला एका भाजपच्या माजी नगरसेवकाने पत्र दिले आहे. यात त्यांनी रस्त्याच्या कामावरुन विषय माझ्याजवळ मांडला आहे, अजुनही यांच्या मतदारसंघात रस्त्याचे काम सुरू झालेले नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.   

"ही काम आता सुरू कधी होणार आणि संपणार कधी. आता एप्रिल महिना संपत आला आहे, मे संपेल पावसाळा जवळ आला आहे. मी काही दिवसापूर्वी रस्त्याची काम पाहत असताना माझ्या लक्षात आले ही काम गेल्या दोन आठवड्यांपासून बंद आहेत. या कामासाठी लागणाऱ्या खडीचे कोणत्यातरी एकाच कंपनीला दिले आहे. त्यामुळे ही कामे ठप्प झाल्याची माहिती मला मिळाली आहे. मे ३१ च्या पुढे ही काम जाणार आहेत. ही मोठी कंपनी कोणाची आहे, का एकाच कंपनीला हे काम दिले आहे.३०० रुपयांनी एक टन मिळणारी रेती आता आपल्याल्या ४०० ते ५०० रुपये टन दराने मिळत आहे. आता हा नवा ट्रक्स लावला आहे. हा काय घोटाळा सुरू आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन  त्यांना विनंती करणार आहे. या रस्त्याच्या कामात लक्ष घालून हा घोटाळा थांबवण्यासाठी मी विनंती करणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे