जुहू बीचवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जीवरक्षकांनी वाचवलं

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 24, 2023 17:52 IST2023-07-24T17:48:28+5:302023-07-24T17:52:26+5:30

तो चक्क जुहू कोळीवाड्याच्या जेट्टी जवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जावून बसला होता...

A young man who tried to commit suicide on Juhu beach was saved by lifeguards | जुहू बीचवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जीवरक्षकांनी वाचवलं

जुहू बीचवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जीवरक्षकांनी वाचवलं

मुंबई - जुहू  बीचवर आज दुपारच्या सुमारास जुहू कोळीवाड्यातील जेट्टीवर खार पश्चिम, गजदरबांद येथील तरुण करमदास रामसिंग दुर्यवंशी (३०) हा घरगुती समस्यांमुळे  आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. तो चक्क जुहू कोळीवाड्याच्या जेट्टी जवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जावून बसला होता.

ही बाब पेट्रोलिंग करतांना येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी, रवी वडवे, अनिकेत पालशेतकर, आदित्य तांडेल, अक्षय मेहेर यांच्या लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात सांताक्रूझ पोलिसांना माहिती दिली. पोलीसही जेट्टीवर आले. जीवरक्षक आणि पोलिसांनी संबंधित तरुणाची समजूत काढली.

जीवरक्षकांनी वाचवलं -
जीवरक्षकांनी खवळलेल्या समुद्रात रेस्क्यू ट्यूब नेत, दीपस्तंभावर जावून बसलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.आणि सांताक्रूझ पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी माहिती मनोहर शेट्टी यांनी लोकमतला दिली.
 

Web Title: A young man who tried to commit suicide on Juhu beach was saved by lifeguards