धावत्या लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा समावेश, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 10:51 IST2023-09-03T10:50:25+5:302023-09-03T10:51:37+5:30

या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

A video has surfaced of a gang in Virar local consuming drugs openly | धावत्या लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा समावेश, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

धावत्या लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा समावेश, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : धावत्या विरार लोकलमधील मालडब्यात एका टोळीने खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टोळीमध्ये सहा मुले आणि एका मुलीचा समावेश असून, त्यांच्याजवळ चरस आणि गांजासह अनेक प्रकारची औषधे असल्याचा दावा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या प्रवाशाने केला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास विरार लोकलमधील मालडब्यात एका मुलांच्या टोळीने खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करत होते. 

हे चित्र बघून एका सहप्रवाशाने आपल्या मोबाइलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला. त्यानंतर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत, त्यांनी सांगितले की, विरार लोकलमधील मालडब्यात सहा मुले आणि एक मुलगी खुलेआम अमली पदार्थांचे सेवन करत होते. ही टोळी नालासोपारा स्थानकात उतरली असल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: A video has surfaced of a gang in Virar local consuming drugs openly