Join us

शाळेच्या इमारतीवरून उडी घेत विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न; कांजूरमधील घटना

By मनीषा म्हात्रे | Updated: October 3, 2022 19:44 IST

प्राथमिक तपासात सहा महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात होती.

मुंबई: कांजूर येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स शाळेच्या टेरेसवरून उडी घेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कांजूर मार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत अधिक तपास करत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत आली. पहिल्या लेक्चर नंतर नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचे सांगून ८च्या सुमारास ती वर्गाबाहेर आली. तेथून तिने दुमजली शाळेचे टेरेस गाठून उडी मारली. जोराचा आवाज झाल्याने सर्वानी तिच्याकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलीसांना देत तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

प्राथमिक तपासात सहा महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात होती. त्यात, नवरात्रीच्या दिवसांमध्ये वडिलांची आठवण येत असल्याने नैराश्येत तिने उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे शिक्षिकेने ओरडल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचीही चर्चा असून याबाबतही कांजूर पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.  

टॅग्स :शाळामुंबईपोलिस