पावणेदाेन लाख प्रवाशांचा ‘व्हिस्टाडोम’मधून निसर्गरम्य प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:43 AM2024-05-07T08:43:50+5:302024-05-07T08:43:59+5:30

२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले.

A scenic journey of 10 million passengers through Vistadome | पावणेदाेन लाख प्रवाशांचा ‘व्हिस्टाडोम’मधून निसर्गरम्य प्रवास

पावणेदाेन लाख प्रवाशांचा ‘व्हिस्टाडोम’मधून निसर्गरम्य प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले व्हिस्टाडोम डबे लोकप्रिय ठरत आहे. २०२३-२४ मध्ये या निसर्गरम्य प्रवासाचा १ लाख ७६ हजार ४०४ प्रवाशांनी लाभ घेतला. त्यामुळे मध्य रेल्वेला २६.५० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले.

२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. डब्यांच्या लोकप्रियतेमुळे मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून हे डबे सुरू केले. 

१५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावर आणखी दोन व्हिस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. २०२१ आणि प्रगती एक्स्प्रेसमध्ये २५ जुलैपासून तसेच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये १० ऑगस्ट २०२२ पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला. याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसादर मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

ही आहेत वैशिष्ट्ये
    व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या
    एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स, पुशबॅक खुर्च्या
    इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लायडिंग कंपार्टमेंट डोअर
    दिव्यांगांसाठी रुंद 
सरकते दरवाजे
    सिरॅमिक टाइल्स फ्लोअरिंग असलेली टॉयलेट
    व्ह्यूइंग गॅलरी

पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस    ४.९८
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन    २.७२
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचे उत्पन्न    २.६०
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस    २.३५

एक्स्प्रेसमधून मिळणारे उत्पन्न (काेटींमध्ये)
मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस    ७.६८
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-    ६.१६
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस

Web Title: A scenic journey of 10 million passengers through Vistadome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.