Join us

वाहनात पोलिसाला हार्ट अटॅक ड्युटीवर असताना गेला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 10:03 IST

सोमनाथ गोडसे असे पोलिस हवालदाराचे नाव आहे.

मुंबई : नुकताच गणेशोत्सव, ईद-ए-मिलादचा बंदोबस्त पार पडला. या बंदोबस्तातून नुकताच मोकळा श्वास घेत नाही तोच डोंगरी परिसरात गस्तीदरम्यान पोलिसाने वाहनातच प्राण सोडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सोमनाथ गोडसे असे पोलिस हवालदाराचे नाव आहे.

गोडसे हे १९९९ पासून पोलिस दलात कार्यरत आहे.  शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गोडसे हे डोंगरी पोलिस ठाण्याच्या मोबाइल व्हॅनमधून परिसरात गस्त करत होते. गस्तीदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. वाहनातच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच पावणे बाराच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेने त्यांच्या सहकाऱ्यांसह कुटुंबीयांना धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन राणे यांनी सांगितले.

टॅग्स :पोलिस