मोठी बातमी! वांद्रे येथील नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टीत भीषण आग, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 09:31 IST2023-05-17T09:28:10+5:302023-05-17T09:31:14+5:30
मुंबईतील वांद्रे परिसरात नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टी भीषण आग लागल्याची घटना बुधवार पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली.

मोठी बातमी! वांद्रे येथील नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टीत भीषण आग, दोन जखमी
मुंबईतील वांद्रे परिसरात नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टी भीषण आग लागल्याची घटना बुधवार पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार या आगीत अद्याप कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. सकाळी ८ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.
VIDEO: वांद्रे येथील नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टीत भीषण आग pic.twitter.com/CfepmTkfW8
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) May 17, 2023
आगीत १० ते १२ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीत दोन जण जखमी झाले असून शाहरुख सय्यद (३०) आणि साहिल खान (१९) अशी जखमींची नावं आहेत. दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.