...तर खाली उडी मारेन! मंत्रालयात खळबळ, चौथ्या मजल्याच्या खिडकीवर चढून इसमाची धमकी
By यदू जोशी | Updated: July 9, 2024 15:13 IST2024-07-09T15:06:39+5:302024-07-09T15:13:05+5:30
अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा करत आहेत. फायर ब्रिगेड आणि पोलिस या इमारती ठिकाणी आले आहेत.

फोटो- सुशील कदम
मुंबई- मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती मंत्रालयाच्या चौथ्या माळ्याच्या मागील बाजूतील खिडकीवर चढला आहे. या खिडकीतून त्या व्यक्तीने उडी मारण्याची धमकी दिली आहे. अधिकारी त्या व्यक्तीसोबत चर्चा करत आहेत. फायर ब्रिगेड आणि पोलिस या इमारती ठिकाणी आले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर
या व्यक्तीचे काहीतरी प्रशासकीय काम असून तो झालेले नाही म्हणून या व्यक्तीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान त्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही दिवसापासून मंत्रालयातील काम होत नसल्याने एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरती हे ज्येष्ठ नागरिक चढले आहेत. पोलिस आयक्त मुंडे यांनी त्या व्यक्तीशी चर्चा केली आहे. अग्निशमन दलाने खाली जाळी टाकली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेन लावून त्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गेल्या एक तासापासून व्यक्ती मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर बसले होते. एका तासाच्या प्रशासनाच्या प्रयत्नानंतर यश आले आहे. या व्यक्तीला आता पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.