Join us

भरधाव टेम्पोच्या धडकेत घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:57 IST

Accident News: घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.  

मुंबई - घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.  नूर फातिमा ही नारायण नगर येथील घराबाहेर खेळत होती. यावेळी भरधाव टेम्पोने तिला धडक दिली. यामध्ये ती जखमी झाली. तिची आई हसीना हिने तिला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

टॅग्स :मुंबईअपघात