सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 05:50 PM2023-08-03T17:50:09+5:302023-08-03T17:50:37+5:30

जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता.

A life was saved as a guardian angel came | सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला

सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला

googlenewsNext

मुंबई:

जुहू बीचवर आज दुपारी जुहू कोळीवाड्यातील जेट्टीवर खार पश्चिम, गजदरबांध येथील तरुण करमदास रामसिंग दुर्यवंशी (३०) हा घरगुती समस्यांमुळे आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. तो चक्क जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता.

पेट्रोलिंग करताना ही बाब येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी, रवी वडवे, अनिकेत पालशेतकर, आदित्य तांडेल, अक्षय मेहेर यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब सांताक्रूझ पोलिसांच्या लक्षात आणून दिली. पोलिसही जेट्टीवर आले. जीवरक्षक आणि पोलिसांनी त्याची समजूत काढत आणि जीवरक्षकांनी समुद्रात लाटांवर स्वार होत खवळलेल्या समुद्रात रेस्क्यू ट्यूब घेऊन जात दीपस्तंभावर जाऊन बसलेल्या तरुणाला बाहेर काढले अशी माहिती मनोहर शेट्टी यांनी 'लोकमत'ला दिली.

Web Title: A life was saved as a guardian angel came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई