ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन
By स्नेहा मोरे | Updated: February 6, 2024 19:44 IST2024-02-06T19:44:07+5:302024-02-06T19:44:52+5:30
काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.

ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन
मुंबई - फ्लोरेन्सस्थित भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांनी रेखाटलेल्या निसर्गसौंदर्याचे ब्लूम हे विशेष प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीस आले आहे. काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.
या प्रदर्शनात त्यांनी निसर्ग आणि रंगावरील प्रेमाने प्रेरित होऊन फुलांची आणि निसर्गाची केलेली तैलचित्रे तशीच काही व्यक्तिचित्रे 'ब्लूम' नावाच्या या प्रदर्शनात मांडली आहेत. ही सर्व चित्रे त्यांनी फ्लॉरेन्समधील त्यांच्या स्टुडिओमध्ये किंवा शहराच्या आसपासच्या परिसरातून रेखाटलेली आहेत.
ब्लूममधून उलगडले निसर्गचित्रण; फ्लोरेन्सच्या भारतीय चित्रकार तन्वी पाठारे यांचे कलाप्रदर्शन pic.twitter.com/ytI7RNUZRX
— Lokmat (@lokmat) February 6, 2024
चित्रकार तन्वी पाठारे या सध्या इटलीच्या फ्लोरेन्स अकादमी ऑफ आर्ट्समध्ये शिकवत आहेत तसेच त्या फ्लोरेन्समधील स्वतःच्या स्टुडिओमध्येही काम करत आहेत. त्यांनी २०१२ मध्ये इटलीच्या फ्लोरेन्स अकादमी ऑफ आर्ट्सच्या चित्रकला शाखेमधून पदवी प्राप्त केली असून, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबईमधून रेखाचित्र आणि चित्रकला यामध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स पदवी अभ्यासक्रम (बीएफए) २००९ साली मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण केला.