पूरग्रस्तांना मदतीचा हात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाखांचा धनादेश सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 21:22 IST2025-10-27T21:19:51+5:302025-10-27T21:22:47+5:30
आज जुहू चौपाटीवर ही मदत छठ पूजेच्या निमित्ताने करण्यात आली असून, छठ व्रत करणाऱ्या महिलांमार्फत मिश्रा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर धनादेश सुपूर्द केला.यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष,स्थानिक आमदार अमित साटम उपस्थित होते.

पूरग्रस्तांना मदतीचा हात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाखांचा धनादेश सुपूर्द
मुंबई-महाराष्ट्रातील अलीकडील पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने, मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या दीप कमल फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
आज जुहू चौपाटीवर ही मदत छठ पूजेच्या निमित्ताने करण्यात आली असून, छठ व्रत करणाऱ्या महिलांमार्फत मिश्रा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर धनादेश सुपूर्द केला.यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष,स्थानिक आमदार अमित साटम उपस्थित होते.
यावेळी मिश्रा म्हणाले की,सनातन धर्माच्या या महान उत्सवानिमित्त, आम्ही भगवान सूर्याला प्रार्थना करतो की असीम ऊर्जाचे अधिपती भगवान भास्कर महाराष्ट्रावर आपले आशीर्वाद वर्षाव करो. समाजसेवा हीच खरी पूजा आहे, आणि या योगदानातून आमच्या संस्थेने महाराष्ट्रातील बांधवांसोबत आपली एकजूट व्यक्त केली.