मुंबई : न्यायमूर्ती चंद्रचूड असल्याचे भासवून ६८ वर्षीय वृद्धेची पावणेचार कोटींना फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुजरातमधील एकाला अटक झाली आहे. भामट्याने मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी, केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवले. बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी घेत एकाने स्वतःची ओळख न्यायमूर्ती चंद्रचूड सांगितली हाेती. अंधेरी पश्चिम भागात राहणाऱ्या पीडित महिलेला मनी लॉन्डरिंग प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे सांगत सतत निगराणीखाली ठेवले. हा गुन्हा १८ ऑगस्ट ते १३ ऑक्टोबरदरम्यान घडला,” असे त्यांनी सांगितले. १८ ऑगस्ट रोजी महिलेला फोन आला. कुलाबा पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत तिच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी झाल्याचा आरोप केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची माहिती कुणालाही सांगू नये, अशी धमकी देत त्याने बँक तपशील मागितले आणि तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले. स्वतःला अधिकारी एस. के. जैस्वाल असे भासवणाऱ्या आरोपीने पीडित महिलेकडून तिच्या आयुष्यावर दोन ते तीन पानांचा निबंधही लिहून घेतला. त्यानंतर तिच्या निरपराधतेची खात्री झाल्याचे सांगत तिला जामीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीसमोर हजर केले, ज्याने स्वतःची ओळख ‘न्यायमूर्ती चंद्रचूड’ अशी करून दिली. गुंतवणुकीची माहिती पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले गेले. यामुळे तिने दोन महिन्यांच्या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये एकूण ३.७५ कोटी रुपये ट्रान्सफर केले.
Web Summary : A 68-year-old woman was defrauded of millions by someone impersonating Justice Chandrachud. The fraudster posed as police and CBI officials, conducting fake online hearings. The victim transferred ₹3.75 crore over two months after being threatened with 'digital arrest' in a money laundering case. A suspect from Gujarat has been arrested.
Web Summary : जस्टिस चंद्रचूड़ बनकर एक 68 वर्षीय महिला से करोड़ों की ठगी की गई। धोखेबाज ने पुलिस और सीबीआई अधिकारी बनकर नकली ऑनलाइन सुनवाई की। मनी लॉन्ड्रिंग मामले में 'डिजिटल अरेस्ट' की धमकी देकर पीड़िता ने दो महीने में ₹3.75 करोड़ ट्रांसफर किए। गुजरात से एक संदिग्ध गिरफ्तार।