Join us

मुंबईत पहाटेच्या सुमारास भीषण आग, २५ झोपड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 09:30 IST

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.

मुंबई - राजधानी मुंबईतीलधारावी झोपडपट्टीत पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. येथील शाहु नगर परिसरातील कमला नगरमध्ये ही आग लागली होती. या आगीत २५ घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

धारावीच्या शाहुनगर परिसरात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. या झोपडपट्टीत मोठा दाटीवाटीचा भाग. परिसरात अनेक लहान मोठी घरं अगदी दाटीवाटीनं एकमेकांना खेटून उभी आहेत. त्यामुळेच, या आगीच्या लोटात २५ घरे जळाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून मदतकार्य सुरू आहे. 

टॅग्स :आगमुंबईधारावीअग्निशमन दल