Join us

मुंबईतील रस्त्यात धावत्या स्कुटीवर कपलचा रोमान्स; VIDEO व्हायरल होताच नेटिझन्सचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 18:43 IST

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर कपलवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मुंबई : क्षणिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण गाड्यांवर स्टंट करताना आढळून येतात. मात्र मुंबईतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला असून एक कपल धावत्या गाडीवरच रोमान्स करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर कपलवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक तरुणी स्कुटी चालवणाऱ्या मित्राच्या दिशेने तोंड करून बसलेली दिसत आहे. नंतर हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. तसंच स्कुटी चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेटही घातलेलं नाही. कपलच्या या बेजबाबदार आणि अश्लील वर्तनानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ बॅन्ड्रा बझ नावाच्या हँडलने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांना टॅग करत सदर हँडलने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "हे धाडसी कपल बॅन्ड्रा रिक्लेमेशन इथं आढळून आलं आहे. रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आपलं लक्ष या व्हिडिओ वेधू इच्छतो." 

दरम्यान, नेटिझन्सनेही या व्हिडिओखाली मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, "हे धाडस नसून मूर्खपणा आहे." तर दुसऱ्या एका यूजरने, "रस्त्यावर कॅमेरे लावण्यात आलेले असताना ट्रॅफिक पोलिस या कपलवर कारवाई का करत नाही?" असा संतप्त सवाल विचारला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस