गोवंडीत घरात शिरलेलया चोरट्याकडून दाम्पत्यावर रॉडने हल्ला

By मनीषा म्हात्रे | Updated: January 3, 2024 19:48 IST2024-01-03T19:48:09+5:302024-01-03T19:48:31+5:30

Mumbai Crime News: लुटीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने दाम्पत्यावर रॉडने जीवघेणा हल्ला चढविल्याची थरारक घटना गोवंडीत बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी शेजारच्या मदतीने आरोपीला पकडून जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अरविंद देशमुख या चोरट्याला अटक केली आहे.

A couple was attacked with a rod by a thief who entered the house in Govandi | गोवंडीत घरात शिरलेलया चोरट्याकडून दाम्पत्यावर रॉडने हल्ला

गोवंडीत घरात शिरलेलया चोरट्याकडून दाम्पत्यावर रॉडने हल्ला

मुंबई - लुटीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याने दाम्पत्यावर रॉडने जीवघेणा हल्ला चढविल्याची थरारक घटना गोवंडीत बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी शेजारच्या मदतीने आरोपीला पकडून जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अरविंद देशमुख या चोरट्याला अटक केली आहे.

या हल्ल्यात पिसे दाम्पत्य जखमी झाले आहे. ऐश्वर्या पिसे या पती आणि मुलासह गोवंडी परिसरात राहतात.  बुधवारी पहाटे पिसे कुटुंबीय गाढ झोपेत असताना पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या घरात अरविंद देशमुख हा चोरटा घुसला. पिसे कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडने त्याने ऐश्वर्या पिसे आणि त्यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला चढवला.

त्यांच्या आवाजाने शेजारच्या मंडळीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. चोरटा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शेजाऱ्यांनी त्याला पकडून ठेवत गोवंडी पोलिसांना कळवले. त्यानुसार, गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: A couple was attacked with a rod by a thief who entered the house in Govandi