धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता, सद्भावना या विषयावर मुंबईत ८ एप्रिलला परिषद, लोकमत मीडिया समूह, अहिंसा विश्व भारती यांचा संयुक्त उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 06:18 IST2025-04-05T06:18:12+5:302025-04-05T06:18:56+5:30

Mumbai News: महात्मा महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला येत्या मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता ‘धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता आणि सद्भावना’ या विषयावर एक परिषद आयोजित आली आहे.

A conference on the topic of world peace and harmony through religious dialogue will be held in Mumbai on April 8, a joint initiative of Lokmat Media Group and Ahimsa Vishwa Bharati | धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता, सद्भावना या विषयावर मुंबईत ८ एप्रिलला परिषद, लोकमत मीडिया समूह, अहिंसा विश्व भारती यांचा संयुक्त उपक्रम

धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता, सद्भावना या विषयावर मुंबईत ८ एप्रिलला परिषद, लोकमत मीडिया समूह, अहिंसा विश्व भारती यांचा संयुक्त उपक्रम

 मुंबई - महात्मा महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला येत्या मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता ‘धार्मिक संवादाद्वारे जागतिक शांतता आणि सद्भावना’ या विषयावर एक परिषद आयोजित आली आहे. लोकमत मीडिया समूह आणि अहिंसा विश्व भारती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. त्याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि बिहारचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

जैन आचार्य डॉ. लोकेश मुनी, महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, अखिल भारतीय भिख्खू संघाचे अध्यक्ष डॉ. भदंत राहुल बोधी, चंडीगड विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती आणि संसद सदस्य सतनाम सिंग संधू व लोकमत मीडिया समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, तसेच माजी राज्यसभा खासदार, सकल जैन समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय दर्डा हे मान्यवर या परिषदेत मार्गदर्शन करतील.

मान्यवरांचा परिषदेत करणार सत्कार
डॉ. विजय दर्डा यांनी या परिषदेबद्दल सांगितले की, जागतिक शांतता आणि सद्भावनेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा या परिषदेत सत्कार करण्यात येईल. अहिंसा विश्व भारती संस्थेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जागतिक शांततेचे राजदूत आचार्य डॉ. लोकेश मुनी आणि बिहारचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान हे मुंबईतील आपल्या मुक्कामात मान्यवरांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत.

Web Title: A conference on the topic of world peace and harmony through religious dialogue will be held in Mumbai on April 8, a joint initiative of Lokmat Media Group and Ahimsa Vishwa Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.