Join us  

‘मन की बात’चे शतक, भाजपकडून शक्तिप्रदर्शन; मुंबईत ५ हजाराहून अधिक थेट प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 7:45 AM

भाजपचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना यानिमित्त राज्यभर विविध  ठिकाणी ‘मन की बात’चे  प्रक्षेपण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी शंभरावा भाग आहे. यानिमित्त प्रदेश व मुंबई भाजपतर्फे जंगी कार्यक्रम होणार आहेत. त्यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. मुंबईत पाच हजार ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली. 

भाजपचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना यानिमित्त राज्यभर विविध  ठिकाणी ‘मन की बात’चे  प्रक्षेपण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील  ५ हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रम होणार आहेत. मागाठाणेत घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लीम महिला, रिक्षाचालक यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :मन की बातनरेंद्र मोदीभाजपा