छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Updated: October 1, 2022 13:14 IST2022-10-01T13:13:30+5:302022-10-01T13:14:30+5:30
छगन भुजबळांसह तिघांवर चेंबूर पोलिसात गुन्हा दाखल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल
मुंबई: महाराष्ट्राचे माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला होता. ज्यामध्ये हिंदू धर्माविरुद्ध वक्तव्य केले गेल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
या संदर्भात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) शुक्रवारी रात्री उशिरा चेंबूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. "त्या व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भुजबळ आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 506 (2) (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. हिंदू धर्माचा अपमान केल्याचा भाषण छगन भुजबळ यांना मोबाईलवरून दोन व्हिडिओ पाठवले होते, असे पीडित व्यावसायिक टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना व्हॉट्सएप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या मिळू लागल्या, ज्यामध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली असा आरोप आहे.