कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना
By गौरी टेंबकर | Updated: March 21, 2023 19:23 IST2023-03-21T19:23:12+5:302023-03-21T19:23:27+5:30
कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार पॉलिसी नूतनीकरणात वृद्धाला चुना
मुंबई : खार पोलिसांचा हद्दीत राहणाऱ्या विक्रम मानको (७१) या व्यवसायिकाला कारचा इन्शुरन्स रिन्यू करण्याच्या नावे अनोळखी व्यक्तीने पॉलिसी बाजार प्रतिनिधीच्या नावाने फोन केला. मानको यांची पॉलिसी संपत आल्याने त्यांना सदर व्यक्तीवर विश्वास बसला आणि कॉलर च्या म्हणण्याप्रमाणे ऑनलाइन रिन्यू करण्याचे त्यांनी ठरवले.
कॉलर नाही त्यांना ईफको टोकियो नावाने पॉलिसी पाठवत वर्षभराचे प्रीमियम १३ हजार ७३२ रुपये भरण्यासाठी एक अकाउंट नंबर पाठवला. मानको यांनी ती रक्कम भरली. मात्र मानको यांना पॉलिसी बाबतचा कोणताही मेल आला नाही त्यामुळे त्यां ना संशय आला. तेव्हा त्यांनी संबंधित कंपनीला फोन केला आणि त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी अनोळखी कॉलरच्या विरोधात कार पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.