९ वर्षीय चिमुकलीवर दोन आजोबांसह तिघांकडून लैंगिक अत्याचार, आईनेही केले दुर्लक्ष

By मनीषा म्हात्रे | Updated: September 2, 2022 21:05 IST2022-09-02T21:05:45+5:302022-09-02T21:05:59+5:30

'मी त्यांना आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच...'

A 9-year-old girl was sexually assaulted by three people including two grandfathers, her mother also neglected her | ९ वर्षीय चिमुकलीवर दोन आजोबांसह तिघांकडून लैंगिक अत्याचार, आईनेही केले दुर्लक्ष

९ वर्षीय चिमुकलीवर दोन आजोबांसह तिघांकडून लैंगिक अत्याचार, आईनेही केले दुर्लक्ष

मुंबई: आई, आजी कामावर गेल्यानंतर ज्यांच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवले त्यांचीच वाईट नजर चिमुकलीवर पडली आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु असल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली आहे. 'मी आजोबा म्हणून हाक मारायचे, पण तेच अत्याचार करत होते.' आईलाही सांगितले असल्याचे सांगताना मुलीला अश्रू अनावर होत आहे. या घटनेने तिला मानसिक धक्का बसला असून पोलिसांकडून तिचे समुपदेशन सुरु आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

नाहूर परिसरात ९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई आणि आजीसोबत राहायची. दोघीही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दिवा येथे राहणारा आरोपी आप्पा उर्फ अशोक एकनाथ वारुंगसे (६२), भांडुपमधील दिनेश रामजी ठक्कर (६५) यांच्याकडे सांभाळण्यासाठी देत होते. आरोपींची तिच्यावर वाईट नजर पडली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार सुरु केले. काही दिवसांपूर्वी नेहा आजीसोबत पैसे मागताना दिसून आली. एका समाजसेवी संस्थेच्या सदस्यांची नेहाच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. त्यांनी नेहाला ताब्यात घेत मानखुर्दच्या बालगृहात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत चौकशी करताच तिच्यावर सुरु असलेल्या क्रूरतेला वाचा फुटली.

२०२० पासून २० जून पर्यंत तिच्यावर अत्याचार सुरु होते. याबाबत तिने आईलाही सांगितले होते मात्र आईनेही तिच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यामुळे नेहावर तीन विकृतांकडून अत्याचार सुरु होते. ही बाब समोर येताच छाया मलैया मुथा (४४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: A 9-year-old girl was sexually assaulted by three people including two grandfathers, her mother also neglected her